
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे:-
१. पाचडचा जिजाबाईंचा वाडा :-
उतारवयात जिजाबाईंना गडावरची
थंड हवा, वारा मानवत नसे, म्हणून
महाराजांनी त्यांच्यासाठी
पाचाडजवळच एक वाडा बांधून दिला.
तोच हा मासाहेबांचा राहता वाडा.
वाडाची व्यवस्था ठेवण्यासाठी
काही अधिकारी तसेच शिपायांची
व्यवस्थाही महाराजांनी केली होती.
पायर्यांची एक उत्तम विहीर, तसेच
जिजाबाईंना बसण्यासाठी केलेले
दगडी आसन बघण्यासारखे आहे. यास
‘तक्क्याची विहीर’ असेही म्हणतात.
२. खुबलढा बुरूज :- गड चढू लागले म्हणजे एक
बुरुजाचे ठिकाण दिसते, तोच हा
सुप्रसिद्ध खुबलढा बुरूज. बुरुजाशेजारी
एक दरवाजा होता, त्यास ‘चित्
दरवाजा’ म्हणत पण हा दरवाजा आता
पूर्णपणे उध्वस्त झाला आहे.
३. नाना दरवाजा :- या दरवाजास
‘नाणे दरवाजा’ असेही म्हणत. या
दरवाजाचा संबंध नाना फडणिसांशी
लावला जातो अशी गैरसमजूत आहे.
नाना दरवाजा याचाच अर्थ लहान
दरवाजा. इ. स. १६७४ च्या मे महिन्यात
राज्याभिषेकाच्या निमित्ताने
इंग्रजांचा वकील हेनरी ऑक्झेंडन याच
दरवाजाने आला होता. या
दरवाज्यास दोन कमानी आहेत.
दरवाज्याच्या आतील बाजूस पहारेकर्
यांसाठी दोन लहान खोल्या आहेत.
त्यांस ‘देवडा’ म्हणतात. दरवाजास
अडसर घालण्यासाठी खोबणी
दिसतात.
४. मदारमोर्चा किंवा मशीदमोर्चा :-
चित् दरवाज्याने गेल्यावर नागमोडी
वळणे घेत गेलेल्या रस्त्याने पुढे गेल्यावर
एक सपाटी लागते. या मोकळ्या जागेत
टोकाशी दोन पडक्या इमारती
दिसतात. त्यापैकी एक पहारेकर्यांची
जागा असून दुसरे धान्याचे कोठार आहे.
येथे मदनशहा नावाच्या साधूचे थडगे आहे.
तेथे एक प्रचंड तोफही दिसते. येथून पुढे
गेल्यावर खडकात खोदलेल्या तीन गुहा
दिसतात.
५. महादरवाजा :- महादरवाज्याच्या
बाहेरील अंगास वर दोन्ही बाजूस दोन
सुंदर कमळाकृती कोरल्या आहेत.
दरवाज्यावर असणार्या या दोन
कमळांचा अर्थ म्हणजे किल्ल्याच्या आत
‘श्री आणि सरस्वती’ नांदत आहे.
महादरवाज्याला दोन भव्य बुरूज असून
एक ७५ फूट तर दुसरा ६५ फूट उंच आहे.
तटबंदीमध्ये जी उतरती भोके ठेवलेली
असतात त्यास ‘जंग्या’ म्हणतात. शत्रूवर
मारा करण्यासाठी ही भोके ठेवलेली
असतात. बुरुजांमधील दरवाजा हा
वायव्य दिशेस तोंड करून उभा आहे.
महादरवाज्यातून आत आल्यावर पहारेकर्
यांच्या देवडा दिसतात तसेच
संरक्षकांसाठी केलेल्या राहण्याच्या
खोल्या दिसतात. महादरवाज्यापासून
उजवीकडे टकमक टोकापर्यंत तर डावीकडे
हिरकणी टोकापर्यंत तटबंदी बांधलेली
आहे.
६. चोरदिंडी :- महादरवाज्यापासून
उजवीकडे टकमक टोकापर्यंत जी तटबंदी
जाते, त्यावरून चालत गेल्यास जिथे ही
तटबंदी संपते, त्याच्या थोडे अलीकडे
बुरुजात ही चोरदिंडी बांधलेली आहे.
बुरुजाच्या आतून दरवाजापर्यंत
येण्यासाठी पायर्या आहेत.
७. हत्ती तलाव :- महादरवाज्यातून थोडे
पुढे आल्यावर जो तलाव दिसतो तो
हत्ती तलाव. गजशाळेतून येणार्या
हत्तींच्या स्नानासाठी आणि
पिण्यासाठी या तलावाचा उपयोग
होत होता.
८.गंगासागर तलाव :- हत्तीतलावापासून
जवळच रायगड जिल्हा परिषदेच्या
धर्मशाळेच्या इमारती दिसतात.
धर्मशाळेपासून दक्षिणेकडे अंदाजे ५० -६०
पावले चालत गेल्यास जो तलाव
लागतो तो गंगासागर तलाव.
महाराज्यांच्या राज्याभिषेकानंतर
सप्तसागर व महानांची आणलेली तीर्थे
याच तलावात टाकली गेली. म्हणूनच
याचे गंगीसागर असे नाव पडले.
शिवकाळात शिबंदीसाठी याचे
पाणी वापरण्यात येई.
९.स्तंभ :-गंगासागराच्या दक्षिणेस दोन
उंच मनोरे दिसतात. त्यासच स्तंभ
म्हणतात. जगदीश्र्वराच्या
शिलालेखामध्ये ज्या स्तंभांचा उल्लेख
केला आहे, ते हेच असावेत. ते पूर्वी पाच
मजले होते असे म्हणतात. ते द्वादश कोनी
असून बांधकामात नक्षीकाम आढळते.
१०. पालखी दरवाजा :- स्तंभांच्या
पश्चिमेस भिंत असलेल्या भागातून ३१
पायर्या बांधलेल्या दिसतात. त्या
चढून गेल्यावर जो दरवाजा लागतो तो
पालखी दरवाजा. या दरवाज्यातून
आपल्याला बालेकिल्ल्यात प्रवेश करता
येतो.
११. मिणा दरवाजा :-
पालखी दरवाज्याने वर प्रवेश केला की,
चढ – उतार असलेला एक सरळ मार्ग
आपल्याला मेणा दरवाजापर्यंत घेऊन
जातो. उजव्या हातास जे सात अवशेष
दिसतात ते आहेत राण्यांचे महाल.
मेणा दरवाज्यातून बालेकिल्ल्यावर
प्रवेश करता येतो.
१२. राजभवन :- राणीवशाच्या समोर
डाव्या हातास दासदासींच्या
मकानांचे अवशेष दिसतात. या
अवशेषांच्या मागे दुसरी जी समांतर
भिंत आहे त्या भिंतीच्या मध्यभागी
जो दरवाजा आहे तेथून
बालेकिल्ल्याच्या अंतर्भागात प्रवेश
केला की जो प्रशस्त चौथरा लागतो
तेच हे महाराजांचे राजभवन.
राजभवनाचा चौथारा ८६ फूट लांब व
३३ फूट रुंद आहे
१. पाचडचा जिजाबाईंचा वाडा :-
उतारवयात जिजाबाईंना गडावरची
थंड हवा, वारा मानवत नसे, म्हणून
महाराजांनी त्यांच्यासाठी
पाचाडजवळच एक वाडा बांधून दिला.
तोच हा मासाहेबांचा राहता वाडा.
वाडाची व्यवस्था ठेवण्यासाठी
काही अधिकारी तसेच शिपायांची
व्यवस्थाही महाराजांनी केली होती.
पायर्यांची एक उत्तम विहीर, तसेच
जिजाबाईंना बसण्यासाठी केलेले
दगडी आसन बघण्यासारखे आहे. यास
‘तक्क्याची विहीर’ असेही म्हणतात.
२. खुबलढा बुरूज :- गड चढू लागले म्हणजे एक
बुरुजाचे ठिकाण दिसते, तोच हा
सुप्रसिद्ध खुबलढा बुरूज. बुरुजाशेजारी
एक दरवाजा होता, त्यास ‘चित्
दरवाजा’ म्हणत पण हा दरवाजा आता
पूर्णपणे उध्वस्त झाला आहे.
३. नाना दरवाजा :- या दरवाजास
‘नाणे दरवाजा’ असेही म्हणत. या
दरवाजाचा संबंध नाना फडणिसांशी
लावला जातो अशी गैरसमजूत आहे.
नाना दरवाजा याचाच अर्थ लहान
दरवाजा. इ. स. १६७४ च्या मे महिन्यात
राज्याभिषेकाच्या निमित्ताने
इंग्रजांचा वकील हेनरी ऑक्झेंडन याच
दरवाजाने आला होता. या
दरवाज्यास दोन कमानी आहेत.
दरवाज्याच्या आतील बाजूस पहारेकर्
यांसाठी दोन लहान खोल्या आहेत.
त्यांस ‘देवडा’ म्हणतात. दरवाजास
अडसर घालण्यासाठी खोबणी
दिसतात.
४. मदारमोर्चा किंवा मशीदमोर्चा :-
चित् दरवाज्याने गेल्यावर नागमोडी
वळणे घेत गेलेल्या रस्त्याने पुढे गेल्यावर
एक सपाटी लागते. या मोकळ्या जागेत
टोकाशी दोन पडक्या इमारती
दिसतात. त्यापैकी एक पहारेकर्यांची
जागा असून दुसरे धान्याचे कोठार आहे.
येथे मदनशहा नावाच्या साधूचे थडगे आहे.
तेथे एक प्रचंड तोफही दिसते. येथून पुढे
गेल्यावर खडकात खोदलेल्या तीन गुहा
दिसतात.
५. महादरवाजा :- महादरवाज्याच्या
बाहेरील अंगास वर दोन्ही बाजूस दोन
सुंदर कमळाकृती कोरल्या आहेत.
दरवाज्यावर असणार्या या दोन
कमळांचा अर्थ म्हणजे किल्ल्याच्या आत
‘श्री आणि सरस्वती’ नांदत आहे.
महादरवाज्याला दोन भव्य बुरूज असून
एक ७५ फूट तर दुसरा ६५ फूट उंच आहे.
तटबंदीमध्ये जी उतरती भोके ठेवलेली
असतात त्यास ‘जंग्या’ म्हणतात. शत्रूवर
मारा करण्यासाठी ही भोके ठेवलेली
असतात. बुरुजांमधील दरवाजा हा
वायव्य दिशेस तोंड करून उभा आहे.
महादरवाज्यातून आत आल्यावर पहारेकर्
यांच्या देवडा दिसतात तसेच
संरक्षकांसाठी केलेल्या राहण्याच्या
खोल्या दिसतात. महादरवाज्यापासून
उजवीकडे टकमक टोकापर्यंत तर डावीकडे
हिरकणी टोकापर्यंत तटबंदी बांधलेली
आहे.
६. चोरदिंडी :- महादरवाज्यापासून
उजवीकडे टकमक टोकापर्यंत जी तटबंदी
जाते, त्यावरून चालत गेल्यास जिथे ही
तटबंदी संपते, त्याच्या थोडे अलीकडे
बुरुजात ही चोरदिंडी बांधलेली आहे.
बुरुजाच्या आतून दरवाजापर्यंत
येण्यासाठी पायर्या आहेत.
७. हत्ती तलाव :- महादरवाज्यातून थोडे
पुढे आल्यावर जो तलाव दिसतो तो
हत्ती तलाव. गजशाळेतून येणार्या
हत्तींच्या स्नानासाठी आणि
पिण्यासाठी या तलावाचा उपयोग
होत होता.
८.गंगासागर तलाव :- हत्तीतलावापासून
जवळच रायगड जिल्हा परिषदेच्या
धर्मशाळेच्या इमारती दिसतात.
धर्मशाळेपासून दक्षिणेकडे अंदाजे ५० -६०
पावले चालत गेल्यास जो तलाव
लागतो तो गंगासागर तलाव.
महाराज्यांच्या राज्याभिषेकानंतर
सप्तसागर व महानांची आणलेली तीर्थे
याच तलावात टाकली गेली. म्हणूनच
याचे गंगीसागर असे नाव पडले.
शिवकाळात शिबंदीसाठी याचे
पाणी वापरण्यात येई.
९.स्तंभ :-गंगासागराच्या दक्षिणेस दोन
उंच मनोरे दिसतात. त्यासच स्तंभ
म्हणतात. जगदीश्र्वराच्या
शिलालेखामध्ये ज्या स्तंभांचा उल्लेख
केला आहे, ते हेच असावेत. ते पूर्वी पाच
मजले होते असे म्हणतात. ते द्वादश कोनी
असून बांधकामात नक्षीकाम आढळते.
१०. पालखी दरवाजा :- स्तंभांच्या
पश्चिमेस भिंत असलेल्या भागातून ३१
पायर्या बांधलेल्या दिसतात. त्या
चढून गेल्यावर जो दरवाजा लागतो तो
पालखी दरवाजा. या दरवाज्यातून
आपल्याला बालेकिल्ल्यात प्रवेश करता
येतो.
११. मिणा दरवाजा :-
पालखी दरवाज्याने वर प्रवेश केला की,
चढ – उतार असलेला एक सरळ मार्ग
आपल्याला मेणा दरवाजापर्यंत घेऊन
जातो. उजव्या हातास जे सात अवशेष
दिसतात ते आहेत राण्यांचे महाल.
मेणा दरवाज्यातून बालेकिल्ल्यावर
प्रवेश करता येतो.
१२. राजभवन :- राणीवशाच्या समोर
डाव्या हातास दासदासींच्या
मकानांचे अवशेष दिसतात. या
अवशेषांच्या मागे दुसरी जी समांतर
भिंत आहे त्या भिंतीच्या मध्यभागी
जो दरवाजा आहे तेथून
बालेकिल्ल्याच्या अंतर्भागात प्रवेश
केला की जो प्रशस्त चौथरा लागतो
तेच हे महाराजांचे राजभवन.
राजभवनाचा चौथारा ८६ फूट लांब व
३३ फूट रुंद आहे

No comments:
Post a Comment